ग्राम स्वराज्य महामंच चा पुरस्कार वितरण सोहळ्यात मंगेश भाऊ राऊत-संपादक आत्मबल आणि फीरोजभाऊ लाखानी -संपादक राळेगाव समाचार यांचा जाहीर सन्मान….!!


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


ग्राम स्वराज्य महामंच च्या संदर्भ लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम गांधी ले-आऊट राळेगाव मध्ये आयोजित करण्यात आला होता वृत्तपत्रांच्या माध्यमातून सतत कोरोणा शी संघर्ष करत CORONA VARIOUS – frant line worker the PILLOR OF DEMOCRACY साप्ताहिक आत्मबल चे संपादक मा.मंगेशभाऊ राऊत आणि मा फिरोजभाई लाखानी संपादक राळेगाव समाचार साप्ताहिक यांचा कोरोणा योध्दा म्हणून जाहीर सन्मान करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे आयोजक मा.मधुसुदन कोवे आणि गिरीधर जी ससनकर मुख्याध्यापक सेवा निवृत्त यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला उपस्थित मा.गोविंद चव्हाण-स्वतंत्र लोक सोसायटी आणि सामाजिक कार्यकर्ते मा.अशोकराव उमरतकर कळंब तसेच मा.महेशभाऊ शेंडे जेष्ठ पत्रकार देशोन्नती मा.प्रा मोहन वडतकर-वर्धा आणि ॲड.फिडल बायदाणी श्रीमती आशा काळे मा.कृष्णराव राऊळकर उपस्थित होते.

या पुरस्कारासाठी संदर्भ लेखन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मा.मधुसुदन कोवे गुरुजी यांनी केले कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य मा.गिरीधरजी ससनकर मुख्याध्यापक सेवा निवृत्त वाल्मिकजी मेश्राम भगवान धनरे शंकर राव तोडासे संजय दुरबुडे मधुकर गेडाम तहसीलदार सेवा निवृत्त यांनी केले.