
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचे राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे. त्यावर आधारित पाच टक्के आरक्षण शिक्षण व नोकरीमध्ये मुस्लिम समाजाला मिळावे अशा मागणीचे निवेदन काल दिनांक 9 जून 2019 रोजी चंद्रपुर काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना दिले.
यावेळी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची कायदेशीर बाजू संविधानानुसार भक्कम आहे. शासनाने कायदा करून आरक्षण देण्याची गरज आहे. राज्यघटनेतील कलम 15 आणि 16 यामध्ये अनुक्रमे शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची तरतूद केलेली आहे. संविधानानुसार धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जात नाही. ती मागणी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक आधारावर मागासलेपणा वर आहे आणि ही मागणी संविधानिकरित्या योग्य मागणी आहे असे सोहेल रजा यावेळी म्हणाले.
यावेळी शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष सुलेमान अली, बल्लारपूर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मुकद्दर, ताजुद्दीन शेख, सुलतान अश्रफ, सय्यद अलीम, अर्शद शेख, अहमद भाई यांची उपस्थिती होती.
