

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
चंद्रपुर : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या वतीने शिवस्मारकाच्या जागेच्या मागणी संबंधात चंद्रपूर शहर महानगपालिकेत आज मंगळवार 23 मार्च रोजी दुपारी 4 वाजता चंद्रपुर महापौर सौ.राखी कंचार्लावार यांना निवेदन देण्यात आले.
मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शिवस्मारक करिता जटपुरा गेट जवळील मनपाच्या कांजी कॉम्लेक्स पुढील जागा निश्चित झाली आहे. ही जागा शिवस्मारक करिता आरक्षित करण्यात यावी अशा मागणीचे पत्र आज देण्यात आले.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
