
प्रतिनिधी:शफाक शेख,चंद्रपूर
चंद्रपूर मनपा च्या आसरा या कोविड रुग्णालयाच्या उदघाटन सोहळा पार पडल्यानंतर महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक डॉ. सुरेश महाकुलकर, संदीप आवारी, सुरेश पचारे, संजय कंचर्लावार, अनिल फुलझेले व आरोग्य अधिकारी अविष्कार खंडाळे सहित अनेकांनी कोरोना नियम धाब्यावर बसवून मास्कविना फोटो काढून आपला बेजबादारपणा दर्शविला.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथ रोग कायदा व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याने मयूर राईकवार या सजक नागरिकाने मनपा पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
मयूर राईकवार यांनी आपल्या तक्रारीत जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना पालिकेतील अधिकारी व पदाधिकारी यांनी 40 लोकांना जमा करून मास्कविना फोटो काढले.
आता सर्वांचे लक्ष आहे पोलीस काय कारवाई करतील याची
