कुही शहरात कचऱ्याचे ढीग घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट म्हणजे अंधाधुंद कारभार“`

प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही

लोकहीत महाराष्ट्र च्या ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/JeQsQvcghCJCKANvkfo9aV

शहरातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी वर्षाला एक, सव्वा कोटीच्या वर खर्च होत असला तरी स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडत आहे . जागोजागी कचऱ्याचे ढिग , तुंबलेल्या नाल्या असे चित्र पाहण्यास मिळत आहे . स्वच्छता करणाऱ्या कामगारास कमी मानधन तर नगसेवकांना दुप्पट मानाचे धन दरमाह मिळत असल्याची जोरदार चर्चा शहरात चविने केली जात आहे . पॉकीट संस्कृतीमुळे शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ होत असल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे . शहरात दररोज जो कचरा जमा होतो त्या कचऱ्याच्या संकलनासाठी नगर पंचायतने नागपूर येथील एका खासगी कंपनीची नेमणूक केली आहे . प्रत्येक घरातील कचरा जमा करण्याची जबाबदारी या कंपनीवर आहे . कंपनी डोअर टू डोअर कचरा संकलित करण्यात मागीलतीन वर्षांपासून | अपयशी ठरली आहे . | त्यामुळे शहरातील प्रत्येक मोकळ्या जागेत आजही कचऱ्याचे छोटे – मोठे ढीग दिसून येतात .

शहरातील जवळपास 10 ते 15 हजार नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर असली तरी याकडे सवयीनुसार दुर्लक्ष करण्यात येत आहे . शहरातील १७ वॉर्डमधील कचरा जमा करण्यासाठी गाड्या , ३ वाहने आहेत . त्यात

ही एखादे वाहन नादुरुस्त आहे . जमा होणाऱ्या कचऱ्यावर अजिबात प्रक्रिया होत नाही . या ठिकाणी कचऱ्याचे मोठ मोठे ढीग तयार झाले आहेत . याकडे संबंधित अधिकारी सुद्धा जाणूनबुजून डोळेझाक करत आहेत का ? असाही प्रश्न पडतोच .

“”अधिकारी मूग गिळून गप्प का ? | या संबंधित खासगी कंपनीने शहरात १०० टक्के डोअर टू डोअर कलेक्शन केल्यास नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारच नाहीत . पण यातही ही कंपनी सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे . त्यात भर म्हणून की काय , वॉर्डात दररोज घंटागाडी न येणे , | गटारी वेळेवर साफ न करणे , गटारी साफ केल्याच तर | त्यातील गाळ वेळेवर न उचलून नेणे , याबाबत संबंधित कंपनीच्या सुपरवायझर यांना विचारणा केल्यास अरेरावीची भाषा ते बोलत असल्याचेही कळते , अश्या अनेक तक्रारी या कंपनीच्या असतांना सुद्धा संबंधित अधिकारी मुग गिळून गप्प का ? असे नागरिकांतून बोलल्या जात आहे .