


प्रतिनिधी:राहुल मदामे, नागपूर
26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसा निमित्त मोफत इंग्रजी स्पिकिंग क्लासेस चे उद्घाटन मूलनिवासी संघा तर्फे सामाजिक भवन ,अंबाझरी टेकडी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोबतच bs4 राष्ट्रव्यापी अभियाना अंतर्गत सिग्नेचर कॅम्पेन सुद्धा चालवन्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बी डी बोरकर सर( राष्ट्रीय अध्यक्ष ,पीपीआय डी) यांनी उपस्तिताचे विस्तृत मार्गदर्शन केले, तसेच मा .रविकांत गौतमी सर (तंत्र अधिकारी,कृषी विभाग) कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभले, व मधुकर मेश्राम सर (अध्यक्ष, बामसेफ नागपूर) यांनी कार्यक्रमाची अध्यक्षता करून उपस्तिताचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मूलनिवासी संघ नागपूर जिल्हा अध्यक्ष चेतन मासुरकर यांनी केले व आभार प्रदर्शन गौरव सोनुने यांनी केले. दिवसाचे महत्व पाहता पूर्व नागपूर उपाध्यक्ष किशोर घरडे यांनी संविधान पर गीत गायिले. मूलनिवासी पाठशालेत इच्छुक विद्यार्थ्याचे रजिष्ट्रेशन करून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.
