

कुही : स्थानिक तहसील कार्यालयात पिण्याचे पाणी , शौचालय या मूलभूत सुविधांचा अभाव आहे . त्यामुळे या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी पिण्यासाठी शेजारच्या पानटपरीवर भौगोलिक जावे लागते , तर लघुशंकेसाठी कुठेतरी आडोसा शोधावा लागतो . यात नागरिकांची गैरसोय , तर महिला व तरुणींची कुचंबना होत आहे .कुही तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे आहे . त्यामुळे तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे . ग्रामीण भागातील पुरुषांसह महिला व तरुणीही या कार्यालयात त्यांच्या कामानिमित्त येतात . या कार्यालयात शौचालय असले तरी ते वर्षभरापासून कुलूपबंद आहे . त्याला लावलेले कुलूप वर्षभरात का काढले नाही , याचे उत्तर कुणीही द्यायला तयार नाही . या असुविधेमुळे आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या काही महिलांनी केली . व्यक्त यासंदर्भात कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून ही समस्या सोडविण्याची अनेकदा मागणी केल्याचे काही नागरिकांनी सांगितले . परंतु , अधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला . या कार्यालयात सुविधांचा अभाव असल्याने जवळच असलेल्या नगर पंचायत चा स्वच्छलय तहसील कार्यालय जवळ शौचालयाचा वापर करावा लागत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले . सहाय्य निबंधक कार्यालय वरच्या माळ्यावर असल्याने पायऱ्या चढताना त्रास होत असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली . परिणामी , ती समस्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .
पिण्याच्या पाण्याची सोय करा या तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना प्यायला पाणी मिळत नाही . कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने नागरिकांना जवळ असलेल्या पानटपरीवर जाऊन पाणी प्यावे लागते . ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही , याबाबत कुणीही बोलायला तयार नाही . तहसील कार्यालयात ‘ वॉटर फिल्टर मशीन लावून सुद्धा निकामी व त्या मशीन वर धूम्रपान करून थुकलेले दिसतात पण त्यांच्या कडे तहसीलदार वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही असं काही महिन्यांपासून बंद अवस्था असल्याने पाणी कुठला पियाचा हा मोठ्या प्रमाणात प्रसन्न निर्माण जनतेला पडला आहे , पाणी फिल्टर असून सुद्धा काना डोळा केल्याचं दिसत आहे तो त्यालाच दुरुस्ती करून वापरले तर ही समस्या सोडविली जाऊ शकते . परंतु , कुणीही ही समस्या सोडवायला तयार नाही .असा आरोप कुही तालुक्यातील जनता करीत आहेत।
