ओबीसी अधिकार मंच व आम आदमी पार्टी कडून शेतकऱ्यांच्या समर्थानात बंद ला पाठिंबा

प्रतिनिधी:राहुल मडामे,नागपूर

नव्या कृषि कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे.गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमधील पाचव्या फेरीतील बैठकीनंतर कोणताही निकाल लागलेला नाही. खरंतर, शेतकऱ्यांच्या या भारत बंदला सर्वच स्तरातून पाठिंबा देण्यात आला आहे. त्याप्रमाणेच या भारत बंद करिता नागपूर येथील सर्व व्यापाऱ्यांनी व लहान व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

ओबीसी अधिकार मंच व आम आदमी पार्टी नागपूर तर्फे संत जगनाळे महाराज जयंती निमित्त माल्यार्पण करून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बदला समर्थन देण्यात आले, याप्रसंगी निकेश पिणे ,पियुष आकरे ,किशोर घरडे,कृतल आकरे,प्रतीक बावनकर,पांतावणे व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना पाठींबा दिलेला आहे.