


मूलनिवासी संघा तर्फे नागपूर जिल्ह्यात अनेक वस्त्यांमध्ये नवीन मतदार नोंदणी उपक्रम राबवण्यात येत आहे, ज्यामुळे नागरिकांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याकरिता किंवा वगळण्या करीता, नावातील त्रुटी भरून काढण्याकरिता अडचण जाणार नाही तसेच शासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा लोकांना शोधण्यास त्रास जाणार नाही मूलनिवासी संघ शासन आणि नागरिकां मधील दुव्या चे काम करीत आहे.
नागपूर शहर व ग्रामीण मध्ये नवीन मतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मूलनिवासी संघा तर्फे चालविलेल्या नवीन मतदार नोंदणी अभियानाला उत्तर नागपूर- वनदेवी नगर, आदर्श नगर, इंदोरा,समता नगर,पूर्व नागपूर,पारडी, आंबेनगर,भांडेवाडी व वाडी शहर नवनीत नगर येथे नागरिकांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन मतदारांची नोंदणी करन्याकरिता मेहनत घेणारे मूलनिवासी संघाचे कार्यकर्ते – चेतन मासुरकर अध्यक्ष नागपूर जिल्हा,महासचिव- नुष्यान हुमने, अनिल चिमनकर, उत्तर नागपूर अध्यक्ष- विनोद डोंगरे,उपाध्यक्ष- रोहन उके, महासचिव- अनमोल उमरे, कोषाध्यक्ष- सुकेश गजभिये, उपाध्यक्ष- नवीन बोदिले, सदस्य अश्वशक्ती बोदेले, विनीत गायसमुदरे,वाडी शहर अध्यक्ष- आकाश जाधव, उपाध्यक्ष- प्रवीण मेश्राम,मयूर येडगे- कोषाध्यक्ष,महासचिव-कांचन गायकवाड पूर्व नागपूर अध्यक्ष- पवन मोटघरे, उपाध्यक्ष- किशोर घरडे, सदस्य झिष्यांन हुमने,आसिफ शेख ,जिल्हा महासचिव नुष्यान हुमने व अन्य कार्यकर्ता उपस्थिती होते.
