
प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही
कुही येथील सफाई कामगारा च्या समस्या विषय कामगार आयुक्तता नि कामगारांच्या बाजूने आदेश दिला असून नगर पंचायत ठेकेदार यांच्या वर कारवाई न करता सफाई कामगार यांना कामावरून कमी करून त्यांना मारण्याच्या धमकी दिली जात आहे. या विरोधात कुही येथील नगर पंचायत मध्ये सर्व 32 स्त्रीया व 18 पुरुष कामगार नगर पंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलनास बसले आहे .जो पर्यंत कामगाराच्या मागण्या व कमी करण्यात आलेल्या कामगार यांना कामावर रुजू करण्यात येत नाही तो पर्यंत नगर पंचायत सोडणार नाही असे कामगार म्हणने आहे.
