माळी महासंघाची काटोल जिल्हा नागपूर ची बैठक संपन्न। “समाजातून मोठ्या प्रमाणात युवा नेतृत्व व युवा उद्योजक निर्माण व्हावे” -अविनाश ठाकरे

काटोल:- दि.19/10/2 021 ला महात्मा फुले सभागृह, काटोल येथे माळी महासंघाची सदिच्छा बैठक संपन्न झाली.
सदर बैठक संत सावता माळी संस्था, काटोल चे कार्याध्यक्ष मा. श्री. रामरावजी भेलकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला मा.श्री. अविनाशजी ठाकरे (राष्ट्रीय अध्यक्ष, माळी महासंघ, सत्तापक्ष नेता मनपा,नागपूर तथा माजी उपाध्यक्ष ओबीसी महामंडळ राज्यमंत्री दर्जा) हे उपस्थित होते. तसेच मा. श्री. अरूणजी तिखे, अध्यक्ष माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश, मा. श्री. रवींद्रजी अंबडकर, सरचिटणीस माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश, मा. श्री. प्रकाशजी वरूळकर, विदर्भ प्रमुख माळी महासंघ, मा. श्री. मुकुंदरावजी पोटदुखे कार्याध्यक्ष पुर्व विभाग माळी महासंघ,मा. श्री. प्रमोदजी हत्ती अध्यक्ष माळी महासंघ जिल्हा नागपूर तथा महामंत्री भारतीय जनता पक्ष तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर, मा.श्री.विजय महाजन कार्याध्यक्ष भाजपा काटोल, मा. श्री. राहुलजी पलाडे अध्यक्ष युवा पूर्व विभाग माळी महासंघ, मा. श्री. श्यामजी नागफासे माळी महासंघ नागपूर हे उपस्थित होते. तसेच संत सावता माळी संस्था काटोल चे उपाध्यक्ष मा. श्री. हितेंद्रजी गोमासे, मा. श्री. रामेशजी तिजारे सचिव, मा. श्री. ज्ञानेश्वरजी बोढाळे कोषाध्यक्ष, मा. श्री. संजयजी डांगोरे संचालक तथा सदस्य पं. स. काटोल, मा. श्री. श्यामजी नाडेकर वरीष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते नरखेड, मा. सौ. वैशालिताई डांगोरे अध्यक्षा महिला आघाडी काटोल हे उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वप्रथम संत शिरोमणी सावता माळी महाराज तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मा.श्री. अरुनजी तिखे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माळी महासंघ, यांनी माळी महासंघाची रचना , उद्देश व भविष्यातील वाटचाल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर मा. श्री. अविनाशजी ठाकरे साहेब (राष्ट्रीय अध्यक्ष, माळी महासंघ, सत्तापक्ष नेता मनपा,नागपूर तथा माजी उपाध्यक्ष ओबीसी महामंडळ राज्यमंत्री दर्जा) यांनी आपल्या मार्गदर्शनातून एकजुटीचा मंत्र दिला. तसेच माळी समाजातून जास्तीत जास्त युवा नेतृत्व, युवा उद्योजक निर्माण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. याकरीता यथोचित सहकार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले. माळी समाजाने प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा उंचावला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर मा.श्री. रवींद्रजी अंबडकर सरचिटणीस माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश, यांनीं उपस्थित सर्व सदस्यांसोबत साधक बाधक चर्चा केली. यात अनेक उपस्थित सदस्यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी बैठकीचे संचालन मा.श्री. किरणजी डांगोरे सर संचालक संत सावता माळी संस्था, काटोल यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. श्री. विजयजी महाजन सर संचालक संत सावता माळी संस्था, काटोल तथा कार्याध्यक्ष भारतीय जनता पक्ष काटोल शहर यांनी केले. या बैठकीचे यशस्वी आयोजन मा. श्री . विजय महाजन,मा.श्री.किरण डांगोरे,मा.श्री.महेंद्रजी देवघरे, मा.श्री. लोकेशजी बारमासे, मा.श्री. श्यामजी नाडेकर, मा.श्री. तुलसीदासजी फुटाणे सर, मा.श्री. हेमराजजी सातपुते (पत्रकार), मा. श्री . प्रशांतजी भोयर, मा. श्री. संदीपजी टेंभे सर, मा. श्री. योगेशजी कोकाटे सर, मा.श्री. धनंजयजी टेंभे सर इत्यादी सर्व सदस्यांनी सहकार्य केले.