‘सत्यशोधक भवन’ येथे महात्मा फुले जयंती साजरी

• महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे जनक

तालुका प्रतिनिधी/११एप्रिल
काटोल – संत सावता माळी संस्था,काटोल तर्फे क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती ‘सत्यशोधक भवन’ येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष रामराव भेलकर तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव रमेश तिजारे, काटोल पं.स.सदस्य संजय डांगोरे, सावित्रीबाई फुले विचारमंच अध्यक्षा वैशाली डांगोरे, प्रा.पुरुषोत्तम कुबडे, ज्ञानेश्वर बोढाळे, हितेंद्र गोमासे, रमेश कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
महात्मा फुले यांनी शैक्षणिक, कृषी, समाज क्रांतिकरिता पुढाकार घेतला म्हणून ते खऱ्या अर्थाने ‘महात्मा’ झाले.रूढी, परंपरा व अंधश्रद्धेला झुगारून वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून सत्यशोधक समाजाची निर्मिती केली.गोर,गरीब,कष्टकरी व बहुजन समाजाच्या जीवनात आशेचे किरण आणून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, असे प्रतिपादन पं. स.सदस्य संजय डांगोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते विजय महाजन, संचालन राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन विश्वभर अकर्ते यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुळशीदास फुटाणे, सुनिल चोरकर, कांचन टेंभे, मोहना खरबडे, कविता कांडलकर, संदीप टेंभे, पुरुषोत्तम चरपे, किरण डांगोरे, शेषराव वरोकर, नंदकिशोर तिजारे, चंद्रकांत बेलसरे, प्रमोद भेलकर, ताराचंद कांडलकर आदींनी परिश्रम घेतले.