गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली काढा-मंत्री बच्चू कडू !,कोरोना काळानंतर या झालेल्या सभेने ग्रस्त समाधानी असल्याचे हजर बाधितांचे मत .

( समस्यांबाबत सरकार सकारात्मक, राज्यमंत्री महोदयांनी केले स्पष्ट.)

(रोजगार निर्मिती वर विशेष भर देण्याचे दिले निर्देश.)

आज दि.२८ मार्च २०२२ला गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत मागील दिनांक १९ जुलै २०२१ च्या झालेल्या सभेचा आढावा बैठक विभागीय आयुक्त सौ.प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या हजेरीत मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सतत आढावा घेऊन मार्गी लावा,त्यांनी आपल्या जमिनी ,घर आणि रोजगार या प्रकल्पाला दिले,त्यांचा वीजपुरवठा मुळीच खंडीत करू नका,थकबाकीदार बाधितांना ४-५ मासिक हप्ते पाडून द्या,वाढीव कुटुंब जे ग्रामपंचायत अंतर्गत नोंदणी झाले -२१२२८ कुटुंब त्यांना २.९० लक्ष रुपये देण्यासाठी आणि फक्त शेती संपादीत बाधितांचा नेमका आकडा काढण्याचे निर्देश दिले.शिवाय सरकार शासन स्तरावर च्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.

रोजगारासाठी ग्रामपंचायत अंतर्गत नोंदणी आणि पुर्ण माहिती घेण्याचे जिल्हापरिषद भंडारा-नागपूर ceo यांना स्पष्ट आणि खास निर्देश दिले.*
गोसेबाधित भंडारा-नागपूर जिल्ह्यातील ८५ पुनर्वसित गाव तक्रार मुक्त गाव करा,असे जिल्हाधिकारी भंडारा आणि जिल्हाधिकारी सौ.विमला, नागपूर यांना निर्देश दिले,तसा अहवाल तात्काळ देण्याचेही सांगितले.
तसेच कलम १८ आणि कलम २८ प्रकरण तात्काळ निकालात काढण्याचे उपजिल्हाधिकारी नागपूर-भंडारा यांना स्पष्ट सांगितले,जेणेकरून सरकार वर व्याजाचा भुर्दंड बसू नये.
सदर सभेत मंत्री बच्चूभाऊ कडू, नागपूरउपजिल्हा प्रमुख संजय अतकरी, बाळकृष्ण जुवार, शिवशंकर माटे,यशवंत टीचकूले,भाऊ कातोरे,मंगेश वंजारी,रोशन गायधने,,वसंता पडोळे, आदिनाथ पडोळे,विष्णू पडोळे,विनोद वंजारी,जोत्सनाताई बोरकर,जितेंद्र गजभिये, बाबूलाल पुडके,दीपक पाल,अतुल राघोर्ते,आकाश भोयर आणि एजाजअली सय्यद यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त होते.