
महात्मा फुल्यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी – पं. स.सदस्य संजय डांगोरे
२६० विवाह इच्छुकांनी दिला परिचय
# “रेशीमबंध” पुस्तकीचे विमोचन
काटोल – संत सावता माळी संस्था, काटोल तर्फे महात्मा फुले स्मृतिदिनी सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती परिचय मेळावा महात्मा फुले सभागृह,काटोल येथे संपन्न झाला.या मेळाव्यात विवाहत्सुक १५६ मुले व १०४ मुलींनी आपला परिचय दिला.या सर्वांचा परिचय असणारी “रेशीमबंध” पुस्तकीचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव दंढारे तर प्रमुख अतिथी म्हणून माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद हाती, सचिव रमेश तिजारे, पं. स.सदस्य संजय डांगोरे, युवा पत्रकार प्रशांत पवार,कार्याध्यक्ष रामराव भेलकर, उपाध्यक्ष हितेंद्र गोमासे,सहसचिव रमेश कांबळे,कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर बोढाळे सौ.वैशालीताई डांगोरे,मोहनराव डांगोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पं. स.सदस्य संजय डांगोरे म्हणाले, महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार समाजाला मिळालेली देणगी आहे.महात्मा फुले हे केवळ एकाच जातीचे नसून संपूर्ण समाजाचे आदर्श आहे. या देणगीचा उपयोग समाज उत्थानांकरिता झाला पाहिजे.समाजाचा विकासाचा मार्ग हा राजकारणाच्या पायवाटेवरून जात असतो.तेव्हा समाजातील चांगल्या व्यक्तिमत्त्वानी राजकिय क्षेत्राकडे वाटचाल करावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे रमेश तिजारे, संचालन किरण डांगोरे, परिचय मेळावा निवेदन अँड.भैरवी टेकाडे व राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन रमेश कांबळे यांनी केले.मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता तुलसीदास फुटाणे, प्रभाकर देवते, मोहन डांगोरे, प्रा.अरविंद तरार,प्रकाश मानेकर,प्रकाश श्रीखंडे, सुनिल चोरकर, विद्यानंद वरोकर, हेमंत घोरसे, शेषराव वरोकर, नंदकिशोर तिजारे, पुरुषोत्तम चरपे, विश्वभर अकर्ते विजय महाजन आदींनी सहकार्य केले.
