रिधोरा येथे ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा साजरा

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल

रिधोरा:-
दरवर्षी प्रमाणे यावर्षी कोरोना असल्यामुळे रिधोरा येथे गेल्या २४ वर्षी पासून अखंड पणे सुरू असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा दि. शनिवार ५ पासुन सुरु झाला गेल्या २४ वर्षीच्या कालखंडात भव्य स्वरुपात अतिशय सुंदर आणि मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा साजरा करण्यात येत असतो. यंदाचे हे सोहळ्याचे २५ वर्ष असुन या वर्षी कोरोना विषाणू मुळे ज्ञानेश्वर समाधी सोहळा हा साधेपणाने साजरा करण्यात आला.
यावर्षी कोरोना विषाणूचे संक्रमण लक्षात घेऊन मंडळाने किर्तन, भारुड व कथा प्रवचन इत्यादी कार्यक्रम रद्द करून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हरिपाठ भजन व काकड आरती आदी कार्यक्रम करून अत्यंत साधेपणाने ५ ते 12 डिसेंबर पर्यंत हा सोहळा रिधोरा येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मध्ये साजरा करण्यात आला.