काटोल  तालुक्यात नविन ६० आॅक्सीजन बेड – अनिल देशमुख 

पंचायत समिती येथे कोरोना विषयी आढावा बैठक

काटोल नरखेड तालुक्याचा कोरोना बाधितांचा घेतला आढावा 

काटोल प्रतिनिधी :-

स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार निलेश कदम, जवंजाळ, रामकृष्ण जंगले, कमलेश कुंभरे तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, वैद्यकिय अधिकारी व सर्वच आस्थापनांचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी काटोल तालुक्यात दररोज घडणारा कोरोना बाधितांचा लेखाजोखा उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी सादर केला गेल्या जानेवारी महिन्यापासून तर आज तारखेपर्यंत संपुर्ण माहिती सादर करण्यात आली त्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की काटोल ग्रामिण रूग्णालय येथे ६ हजार लिटर क्षमतेची टॅंक अंदाजे ६० लाख रुपये खर्च करून तयार करण्यात येणार आहे त्यामुळे आॅक्सीजनचा प्रश्न निकाली निघेल तसेच नरखेड येथेसुद्धा ग्रामीण रुग्णालयात आॅक्सीजन टॅंक उभारण्यात येत असून त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून काम सुद्धा सुरू करण्यात आले आहे व काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे सध्या काटोल तालुक्याची परिस्थिती ठिक असुन उपचारादरम्यान ज्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले त्याबद्दल संवेदना व्यक्त करुन काटोल ग्रामिण रूग्णालय येथे ६० आॅक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात येत आहे याशिवाय अजुन कुठल्या सुविधा उपलब्ध करून घेता येतील त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले सोबतच आमदार निधीतून ६० लाख याप्रमाणे एकूण एक कोटी विस लाख रुपये खर्च करून काटोल नरखेड तालुक्याकरीता ६० आॅक्सीजन काॅंन्सट्रेटर व १७ ईसीजी मशीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा पुरवठा व इतर औषधे नियमित उपलब्ध राहतील याविषयी निर्देश देण्यात आले आहेत. ज्या नागरिकांनी अॅंटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी केली त्यांनी गृहविलगीकरणात राहुन आपला औषधोपचार करावा सोबतच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जे लसीकरण करण्यात येत आहे त्याला प्रतिसाद देऊन नियमानुकुल वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करुन घेण्यासाठी पुढाकार घेऊन आपला तालुकाच नव्हे तर संपूर्ण विधानसभा क्षेत्रात शंभर टक्के लसीकरण करण्याचे आवाहन देखील याप्रसंगी माजी गृहमंत्री व काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार अनिल देशमुख यांनी केले 

प्रतिनिधि:ऋषिकेश जवंजाळ