यशस्वीतेकरिता अभ्यासासोबतच कौशल्य विकसित करा – शशिकांत देशपांडे,करिअर मार्गदर्शन व गुणवंत सत्कार सोहळा

विधी कॉम्प्युटर अँकडमी भारसिंगीचे आयोजन

तालुका प्रतिनिधी/९ जुलै
काटोल – आयुष्यात यशाची शिखरे काबीज करण्याकरिता विद्यार्थीदशेतच ‘ध्येय’ निश्चित करा.त्या ध्येयावर स्वार होण्यासाठी योग्य नियोजन करून अहोरात्र मेहनत करा.आधुनिक युगात विविध कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे.उत्कृष्ट कार्य आपल्या हातून पार पाडण्यासाठी विद्यार्थी दशेतच अभ्यासासोबतच विविध कौशल्ये आत्मसात करा म्हणजे जीवनात नक्की यशस्वी व्हाल असे प्रतिपादन करिअर बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना एमकेसीएल चे विभागीय समन्वयक शशिकांत देशपांडे यांनी केले.
अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी व विधी कॉम्प्युटर अँकडमी भारसिंगी यांच्या संयुक्त विद्यामानाने अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय, भारसिंगी येथे ‘करीअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा’ संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.प्रकाश पवार तर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ विभागीय समन्वयक शशीकांत देशपांडे, प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक मनोज चौधरी, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ जिल्हा समन्वयक वैभव हजारे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष नोरोलीया,अविनाश बाग डडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी दहावी- बारावी शालांत परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणारे संजीवनी शेंडे, पूजा घागरे,तेजस चवडे, प्रेम कयांदे, ओम सोनबरसे, मयुरी कांबळे, धनश्री धोटे, संदेश फंदी, कृणाली कडू, भावना चरपे, श्रुतिका शेंबेकर, आयर्न दारोकर , पिंकी पेठे, रुपाली सातपुते, विशाखा पाठे, पायल काकडे, विशाल वानखेडे, पायल सोनूलकर, इशाराणी खरपुरीया, हर्षाली पेरोडीया, विशाली धुंदे, मयुरी नेहारे, प्रांजली नेहारे यांचा शाल,श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी कॉम्प्युटर अँकडमी, भारसिंगी चे संचालक भुवनेश्वर बासेवार, तर संचालन प्रा. मानसी जोशी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विधी कॉम्प्युटर अँकडमी भारसिंगीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.