महिला शिक्षण दिनानिमित्त शासनाचे आभार – पं. स.सदस्य संजय डांगोरे

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ काटोल:-


संत सावता माळी संस्थेचा उपक्रम
सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध पत्करून शिक्षणाचा प्रसार प्रचार केला.मुलींसाठी शाळा उघडल्या त्यांच्या कार्याचा सन्मानार्थ सावित्रीबाई फुले जयंती ही ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरी करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे आभार मानतो असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य संजय डांगोरे यांनी केले.
संत सावता माळी संस्था तर्फे ‘महिला शिक्षण दिन’ कार्यक्रम संत सावता माळी वाचनालय , काटोल येथे घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाबराव दंढारे तर प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते विजय महाजन, रामरावजी भेलकर, सचिव रमेश तिजारे, हितेंद्र गोमासे, शेषराव वरोकर,रमेश कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय महाजन , संचालन राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन किरण डांगोरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मोहन डांगोरे, विद्यानंद वरोकर, सुनिल चोरकर, तुळशीदास फुटाणे, प्रकाश श्रीखंडे यांनी परिश्रम घेतले.