विद्यार्थ्यांच्या मनात जागा करणारे शिक्षक पांडुरंग मानकर यांचा निरोप समारंभ

माजी जि.प.उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांचे प्रतिपादन


काटोल – शिक्षकीपेशा टाईमपास करणारा नाही तर ठरलेल्या वेळी अभ्यासक्रम पूर्ण करणारा आहे.विद्यार्थ्यांची प्रगती हेच शिक्षकांच्या यशाची पावती असते.पांडुरंग मानकर यांनी विद्यार्थ्यांच्या मनात जागा निर्माण करून आदर्श शिक्षकांची प्रतिमा जपली आहे.असे प्रतिपादन माजी जि.प.उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी मेंढेपठार (बाजार) येथील निरोप समारंभ प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच दुर्गाताई चिखले, गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर, मायवाडी केंद्रप्रमुख पांडुरंग मानकर, मेंढेपठार केंद्रप्रमुख रामभाऊ धर्मे, मेटपांजरा केंद्रप्रमुख सुरेंद्र कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.
मागील चार वर्षांपासून मानकर यांनी मेंढेपठार केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून कार्य बघितले आहे.शिक्षक व विद्यार्थी गुणवत्ता सुधारण्यासाठी उपक्रम राबविले.दिलेली कोणतीही जबाबदारी यशस्वीपणे पार पडण्याची किमया त्यांनी साधली आहे असे प्रतिपादन कोंढासावळी मुख्याध्यापक अरुण पांडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख रामभाऊ धर्मे , संचालन राजेंद्र सातपुते तर आभार प्रदर्शन संजय चिखले यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुनिल ठाकरे, कल्पना मांडवकर, अरुण पांडे, अनिल दारोकर, सिद्धार्थ लांडगे, दिलीप केने, गोपाल नेहारे, मिलिंद यावलकर,निलिमा दुपारे, संजय आवारी आदींनी सहकार्य केले.