

आतापर्यंत ३७ वेळा केले रक्तदान
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल
लोकहीत महाराष्ट्र ग्रुप ला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/KDoKv0xUj9OG6Fhz3TPV6W
प्रतिनिधी /१४ जून
काटोल – रक्त कारखान्यात तयार करता येत नाही.मात्र आरोग्यविषयक बाबीकरिता रक्ताची आवश्यकता भासतच असते.रक्ताच्या तुडवड्यामुळे बरेच रुग्ण वेळप्रसंगी दगवितात.हीच रक्ताची निकड लक्षात घेऊन काटोल पंचायत समिती अंतर्गत जि.प.प्राथमिक शाळा,आलागोंदीचे मुख्याध्यापक राजेंद्र रामहरी टेकाडे रक्तदान करण्याविषयी मागील १५ वर्षांपासून जनजागृती करीत आहे.स्वतः आतापर्यंत ३७ वेळा रक्तदान केले असून त्यातील २० वेळा रक्तदान शिवजयंतीला केलेले आहे.
तसेच नुकतेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे ‘देहदान संकल्प’ केलेला आहे.कारण मृत्यूनंतर देह मातीत पुरला जातो किंवा जाळला जातो.मात्र वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देह मिळाल्यास त्याचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी होतो असे त्यांचे मत आहे.
काटोल परिसरात शालेय उपक्रमात तसेच सामाजिक चळवळीत त्यांचा सहभाग असतोच मात्र रक्तदानाविषयी असणारा गैरसमज व अंधश्रद्धा समाजातून नष्ट करण्याकरिता ते प्रयास करीत असतात.तसेच गरजूंना रक्त मिळण्याकरिता शेर शिवाजी युवा संघटनेचे संस्थापक सागर राऊत यांच्या माध्यमातून सहकार्य करीत असतात.
आयुष्यात ५० वेळा रक्तदान करण्याचा त्यांचा संकल्प आहे.त्यांनी केलेल्या रक्तदानातून बऱ्याच रुग्णाचे प्राण वाचलेले आहे.खऱ्या अर्थाने सामाजिक शिक्षण स्वतःच्या कृतीतून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
