


कोरोनामुक्त व 100% लसिकरण झालेल्या मेंढेपठार (बाजार) गावाचा आदर्श समोर ठेवा
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल
….दि.22/05/2021 रोज शनिवारला आ.अनिलबाबु देशमुख ,माजी गृहमंत्री म.राज्य यांनी काटोल तालुक्यातील मेंढेपठार ( बाजार)गावाला भेट देऊन गांव कोरोनामुक्त व 45 वर्षावरील नागरिकांचे संपूर्ण लसिकरण झाल्याबद्दल येथील सरपंच सौ.दुर्गाताई चिखले यांचे कौतुक केले तसेच 100% लसिकरण करण्यासाठी डाॅक्टर , पोलिस , आरोग्य कर्मचारी ,ग्रामसेवक , तलाठी , अंगणवाडी सेविका ,पोलिस पाटील ,संगणक परिचालक ,आशा वर्कर, ,
मदतनिस ,परिचारक व गावातील सर्व नागरिक यांचे अभिनंदन केले.
मेंढेपठार (बाजार) या गावाने सरपंच यांच्या नेतृत्वाखाली कोवीड – 19 प्रतिबंधक उपाययोजना उत्कृष्ट पणे राबवुन आदर्श निर्माण केला व लोकांच्या आरोग्याचे रक्षण केले हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मेंढेपठार (बाजार)येथे श्री हनुमानजीची पुजा करून संपुर्ण काटोल -नरखेड मतदारसंघ कोरोनामुक्त व 100% लसिकरण करून लोकांचे आरोग्य सुरक्षित करण्याचा संकल्प केला
सर्व नागरिकांचे जीवन अमुल्य आहे , त्यांना सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येईल तसेच तिस-या लाटीचा लहान मुलांवर परिणाम होणार असून याची पालकांनी काळजी घ्यावी , वेळीच डाॅक्टरांकडून उपचार करून घ्यावे , म्युकरमायकोसीस रोगांसंदर्भात लोकांनी जागरूक राहावे .शासनाच्या सुचनाचे पालन करावे , घरीच उपचार न करता डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन अनिलबाबु देशमुख यांनी मेंढेपठार (बा)येथुन मतदारसंघातील सर्व जनतेला केले.
यावेळी नागपूर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले प्रामुख्याने उपस्थित होते.सोबत पं.स.सदस्य संजय डांगोरे, माजी सदस्य निशिकांत नागमोते , जयंत टालाटुले , कृ.उ.बा.स.चे संचालक बंडुभाऊ राठोड , उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव , तहसिलदार अजय चरडे , ग.वि.अ.संजय पाटील,पो.नि.महादेव आचरेकर , पुरवठा निरीक्षक कमलेश कुंभरे,ता.वै.अ.डाॅ.शशांक व्यवहारे , वै.अ.डाॅ.हर्षवर्धन मानेकर , नितीन ठवळे,आकाश गजबे , प्रशांत खंते ,मुन्ना पटेल ,निलेश नानोटकर, वसंतराव चरपे , यादवराव इंगळे , रफीक शेख ,अजय बांबल ,विठ्ठल थोटे ,सुमनबाई कोहळे , प्रविण थोटे ,बेबी शिरपुरकर ,राजेंद्र सातपुते, संगीता कुंभारे, चंद्रभान हेलोंडे ,नरेंद्र कोहळे, सतिश कापसे , मनोहर हेलोंडे ,पुरूषोत्तम कोहळे ,दिलीप हेलोंडे, गजानन क्षीरसागर उपस्थित होते. ग्रामसेवक सारंगधर आंबलके ,तलाठी जहीर शेख , आरोग्य सेविका भारती भांडारकर ,अंगणवाडी सेविका मिना भोयर ,सुनंदा चरपे ,संगणक परिचालक बबलु बराडे , पोलिस पाटील सिमा हेलोंडे , मदतनिस मंदा कापसे , परिचारक पंढरी सातपुते यांनी सहकार्य केले .
