आमदार राजूभाऊ पारवे यांचा नेतृत्वात कुही तालुक्यातील शेकडो महिला व भाजपचा माजी उपाध्यक्ष महिला आघाडी पिंकीताई राजेंद्र रोडगे वेलतूर यांनी घेतला काँग्रेस पक्षात प्रवेश.


दिनांक 09/08/2022 रोज मंगळवारला आमदार राजूभाऊ पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालय उमरेड येथे कुही तालुक्यातील वेलतूर व मांढळ येथील महिला पदाधिकारी यांनी आमदार राजूभाऊ पारवे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
आमदार राजूभाऊ पारवे यांचा कार्याला प्रेरित होऊन आज वेलतूर शहरातील व मांढळ येथील महिलांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला या वेळी आमदार मोहद्यानी तुम्हाला समाजात काम करत असतांना कोणतीही अडचण आली तर मी आपल्या पाठीशी आहे महिलांना एकत्रित येऊन काम करण्याची काढाची गरज आहे. वाढत्या महागाई ला विरोध करण्याचे काम येणाऱ्या काढत करायचे आहे. महिलांना बचत गटाचा माध्यमातून उद्योग निर्मिती करीता लागणारी माहिती व मदत करण्याची ग्वाही दिली.
प्रवेश घेण्यारांची नावे 1) पिंकीताई राजेंद्रजी रोडगे, माजी उपाध्यक्ष महिला आघाडी (BJP)वेलतूर, 2) प्रीती मनोज फेंडर वेलतूर, 3) अर्चना राजेश पाटील मांढळ तसेच वेलतूर व मांढळ येथील महिलानी घेतला काँग्रेस पक्षात प्रवेश…..

या वेळी तालुका अध्यक्ष काँग्रेस उपासराव भुते, माजी जि. प. सदस्य मनोज तितरमारे, संजय निराधार योजना अध्यक्ष सुनील किंदर्ले, माजी संचालक हरिष कडव, माजी प. स. सदस्य संदीप खानोरकर, सरचिटणीस काँग्रेस हरिदास लुटे, संजय निराधार योजना अध्यक्ष जितेंद्र गिरडकर, माजी संचालक बाळू आंबोने, माजी सरपंच क्रिष्णा खोब्रागडे, चेतन पडोळे, तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.