
वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात टाळा – उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव
पंचायत समिती व पोलिस विभागाचे आयोजन
काटोल – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्धापन दिनानिमित्य पंचायत समिती व पोलीस विभाग तर्फे रस्ता सुरक्षा व वाहतुक नियम जनजागृती कार्यशाळा पंचायत समिती सभागृह काटोल येथे प्रत्यक्ष आणि गुगल मीट द्वारे आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सभापती धम्मपाल खोब्रागडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी संजय पाटील, गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के , शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणाले, समाजात होणारे रस्त्यावरील अपघात टाळायचे असेल तर प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे.आपली सुरक्षा ही आपल्या हाती आहे.वाहने चालवितांना नियमाचे उल्लंघन करणे टाळावे.समाजातील प्रत्येक व्यक्तीने दक्षता पाळली तर मानवी चुकांमुळे अपघात होणारच नाही.
ऑनलाइन आभासी पद्धतीने रस्ते सुरक्षा कार्यशाळेत 68 शाळांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, संचालन जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्रसमन्वयक राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सतिश बागडे,दिलीप तुरकर, चेतलाल कटरे, श्रीधर फुलारे, अजय कांबळे आदींनी सहकार्य केले.
