


प्रतिनिधी:राहुल मडामे,नागपूर
संविधानाची बुक वाटप करीत महामानवाला महावंदन🙏
मूलनिवासी संघ वाडी शहर युनिट तर्फे बीएस4 अभियानांतर्गत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसा निमित्त त्याच्या स्मूर्तीस मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन वाडी शहर अध्यक्ष आकाश जाधव यांनी केले, प्रास्ताविक मधुकर मेश्राम सर यांनी मांडले, तसेच प्रमुख वक्ता म्हणून बोंबले सरांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे समारोपीय भाषण डॉ. मेश्राम सर यांनी केले. व उपस्तीत नागरिक व वाडी शहर टीम चे आभार कर्नाटक प्रभारी सोनाली कान्हेकर यांनी केले. याप्रसंगी उपस्तीत नागरिकांना संविधानाची संक्षिप्त स्वरूपातील संविधानाची बुक वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात नागपूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल मडामे, भीम शिरसाट, आकाश कांबळे,आनन्द पेंडसे, गौरव सोनोने, वाडी शहर महासचिव कांचन गायकवाड, उपाध्यक्ष प्रवीण मेश्राम, सदस्य चेतन बागडे,राकेश रहांगडाले ,सुशील गणवीर,संगम मेश्राम,निलेश राऊत,अश्विन बागडे,बंटी राघोरते उपस्तीत होते
