
कुही :-पोलीस स्टेशन कुही येथे दि . 18/03/2022 रोजी प्रविण जुनघरे यांनी पो . स्टे . ला येवुन रिपोर्ट दिली की , त्यांचे शेतातील शेतीपीक सिंचनाकरीता ठेवलेले इंजिन चोरीस गेले अशा तक्रारीवरून अप . क्र . 115/22 कलम 379 , 34 , 411 भा . द . वि . अन्वये गुन्हा नोंद होता . सदर गुन्ह्याचे तपासामध्ये यातील आरोपीतांचा शोध घेवुन आरोपी नामे- स्वप्निल दसरथ मानवटकर वय 31 वर्ष व श्रीवंत देवरावजी जुनघरे वय 39 वर्ष दोन्ही रा . डोंगरगाव ता . कुही जि . नागपुर यांना अटक करण्यात आलेली असुन गुन्ह्यात चोरीस गेलेले इंजिन जप्त करण्यात आलेले आहे . सदर आरोपी हे पि . सी . आर . मध्ये असताना पो . स्टे . कुही अप . क्र . 149/21 कलम 379 भा . द . वि . च्या गुन्ह्याची कबुली दिली त्यावरून त्याचे इतर दोन साथीदार कृष्णा उर्फ किसना भाउराव छापेकर व सुरेश घनश्याम चंदनबावणे दोन्ही रा . डोंगरगाव यांना अटक करण्यात आलेली असुन पाण्याची मोटारपंप जप्त करण्यात आले असुन अधिक तपास सुरु आहे . सदर दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहे . सदरची कार्यवाही मा . पोलीस अधिक्षक सा . मा . अपर पोलीस अधिक्षक सा , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी सा . उमरेड , मा . मदने सा . पोलीस निरीक्षक पो . स्टे . कुही यांचे मार्गदर्शनामध्ये पोउपनि . ठमके , पोहवा / नामदेव पुजारी , पोशि / अनिल करडखेले , पोशि / संदिप गुट्टे , पोशि / भागवत गुट्टे , पोशि / गजानन करे पो . स्टे . कुही यांनी केली .
,,,
