राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर लवकरच वेबसिरीज :गृहमंत्री अनिल देशमुख

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य नविन पिढीला प्रेरणादायी ठरु शकते. यामुळे त्यांवर वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून या वेबसिरीजसाठी निधीची मागणी केली. ती मागणी अजित पवार यांनी मान्य केली असून लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर वेबसिरीज येणार असल्याची माहीती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
या शिष्टमंडळात आर्चाय वेरुळकर गुरुजी, भाष्कराव विघे, गुहाडे महाराज, अरविंद काळमेघ, डॉ. नरेंद्र तरार, रवि डावले, रामेश्वरजी बघरट, राजदत्त मायालु यांच्यासह इतर मान्यवर उपस्थीत होते. श्री संत तुकडोजी महाराज प्रचार व प्रक्षिशण संस्था, दासटेकडी, गुरुकुंज मोझरी जि. अमवराती ही संस्था गेल्या अनेक दिवसांपासुन राष्ट्रसंतावर एखादा चित्रपट व्हावा जेनेकरुन त्यांचे विचार हे नविन पिढीला कळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. विदर्भातील जवळपास ३६ आमदार तसेच खसदारांनी या मागणीचे पत्र राज्य शासनाला सादर केले आहेत.
या संदर्भात सुरुवातीला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहीती व प्रसारन विभागाचे संचालक श्री आंबेकर व त्यांच्या सहकार्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत आज चित्रपटापेक्षा वेबसिरीजला जास्त प्रतिसाद असल्याने ती तयार करण्यात यावी यावर सविस्त चर्चा झाली. ज्या नविन पिढीलापर्यत राष्ट्रसतांचे विचार पोहचावे ती आज मोबाईल, लॅपटॉपवर जास्त असते त्यामुळे चित्रपटापेक्षा वेबसिरीजला जास्त प्रतिदास मिळेल असा सुर या बैठकीतुन आला. त्यामुळे वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेवुन या वेबसिरीजसाठी लागणाऱ्या खर्चाला मंजुरी मिळण्यासाठीची मागणी केली. या बैठकीत सवीस्त चर्चा करुन लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर वेबसिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहीती अनिल देशमुख यांनी दिली.