शिक्षक सेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार


काटोल – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, काटोल-नरखेड तर्फे काटोल तालुक्यातून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुक्रमे सती अनुसया माता विद्यालय, पारडसिंगाची विद्यार्थिनी कु.चेतना गिरीधर तिजारे व बी.आर.ज्युनिअर कॉलेज, काटोलची विद्यार्थिनी कु.मनिषा दिगांबर देवघरे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हा प्रतिनिधी शेषराव टाकळखेडे, दिलीप वरोकर, तुलशीदास फुटाणे, अनिल कुंभारे, पांडुरंग भिंगारे,राजेंद्र बोरकर, विवेक बोरकर, भुषण आगे, विश्वभर अकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.