
तालुका प्रतिनिधी/३१जुलै
काटोल – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारला येथे ‘पहाटपक्षी मित्रमंडळ’ काटोल तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले पहाटपक्षी मित्रमंडळाचे सदस्य नरहरी काकपुरे, विजय केला, अशोक जवंजाळ, गुणवंत भिसे, जोसेफ सर व सौ काकपुरे मॅडम यांच्या हस्ते इयत्ता १ ते ४ थी पर्यतच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक, पाणी बॉटल व पेन्सिलचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिष मोरोलिया, उपसरपंच उमेश बेहनिया, गणेश मोहरिया , शाळेचे मुख्याध्यापक संजय ताथोडे व सहायक शिक्षिका वनिता गोरे उपस्थित होते.
