इंडिया बुक आँफ रेकाँर्डस व ऐशीया बुक आँफ रेकाँर्डस मध्ये काटोलच्या सौ. पुनम प्रतिकराव पदमावार(वैद्य) यांची क्रीडा प्रकारात नोंद

विदर्भातील काटोल च्या मराठी महिलेचा आशियात डंका


(काटोल प्रतीनीधी)
काटोल येथील खादी व ग्रामोघोग मंडळात सेवानिवृत श्री दिलीप वैघ यांची कन्या सौ. पुनम प्रतिकराव पदमावार(वैद्य) हिने हूला हुपिंग(कमरेभोवती रिंग फिरविणे) या क्रिडा प्रकारात ५किलोमिटर अंतर सतत चालत व कमरेभोवती रिंग फिरवत पुर्ण केले. हे अंतर कापावयाला २९वर्षिय पुनमला १ तास वेळ लागला
असुन हा तिचा आशिया खंडातिल विक्रमाची दखल घेतली असुन “इंडिया बुक आँफ रेकाँर्डस व ऐशीया बुक आँफ रेकाँर्डस ” मध्ये नोंद झाली आहे. पुनम हि अभिंयता असुन संगनकशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे . ती बंगळुरू येथे व्हेरीफोन ह्या कंपनीत कार्यरत आहे. पुनमचे या विक्रमी यशाबद्दल काटोलमधे सर्व क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.
काटोल पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे,जेस्ट साहीत्तीक स्वामी बुद्धदेव भारती,शहर
राकाँ अध्यक्ष गनोश चन्ने,माजी जिप सदस्य चंद्रशेखर कोल्हे,व्यापारी संघटनेचे दिलीप घारड,व्रुत्तपत्र संघटनेचे रविंद्र हजारे,योग समितीचे दिलीप कडु,क्रिडा शिक्षकआणि क्रिडा संघटना आदींनी सौ. पुनम वैद्य पदमराव यांचे अभीनंदन करुन पुढील वाटचाली साठी सुभेच्छा दिल्या.