प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील कृषी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बसले आहेत मग कोणतेही क्षेत्र असो बँक तहसील कार्यालय कृषी कार्यालय आता कृषी व्यापारी याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे लहूजी शक्ती सेना हिमायतनगर यांच्या वतीने आज कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावर्षी पाऊसाने लवकर सुरुवात केली असुन कृषी विभागाने कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांना व्यवस्था केली नाही योग्य मार्गदर्शन केले नसल्याने शेतकर्यांची लुबाडणूक केली जात आहे.आज सोयाबीन महाग झाले असे सांगुन दरवर्षी पेक्षा हजारो रुपये वाढुन घेतले जात आहे ९३०५जी एक एस यांची खरी किंमत तर २२०० रुपये शासनाने जाहीर केलेली असताना देखील बाजारात ३८०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना मोबदल्यात घ्यावी लागते कारण शेतकरी मजबुर असतों तो कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तो खरेदी करतो यावर कोठे तरी आळा बसला पाहिजे काही बोगस बियाणे देखील बाजारात विक्रीसाठी आलेले आहेत मात्र काही भ्रष्ट अधिकारी याकडे कानाडोळा करताना दिसतात तसेच खतांच्या बाबतीत तसेच आहे आज शासनाने ठरवून दिलेल्या किमती पेक्षाही वाढीव किमतीत विकताना दिसुन आले जर का हे असंच चालत राहिले तर येणाऱ्या काळात शेतकरी कंगाल होईल त्यामुळे वाढीव किमती थांबून शेतकऱ्यांना दिलासा द्या नाहीतर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जन आंदोलन करण्यात असे निवेदन कृषी अधिकारी यांना देण्यात आले देण्यात आले त्यावेळी उपस्थित राजू गायकवाड विकास गाडेकर गंगाधर गायकवाड नागोराव शिंदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.