श्री नृसिंह जयंती आपापल्या घरातच राहून साजरी करावी – मुरहारी यंगलवार

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर

हिमायतनगर| दासरी-माला दासरी समाजाचे कुलदैवत भगवान श्री नृसिंह यांची जयंती यंदा दि.२५ में रोजी आली आहे. सध्या कोरोनाचा कार्यकाळ चालू असल्याने शासनाकडून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी संचारबंदी लागू आहे. हि बाब लक्षात घेता सर्व दासरी – मालादासरी समाज बांधवांनी मंदिरात जाऊन गर्दी न करता घरातच भगवान नृसिंहाला अभिवादन करावे. तसेच दिवे लावून कोरोनापासून सुरक्षा मिळावी म्हणून साकडे घालावे असे आवाहन समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष मुरहारी दमण्णा यंगलवार यांनी केले आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सुरु असलेल्या संचारबंदीच्या टप्प्यात पुन्हा १४ दिवस वाढ काण्यात आल्याने दि.०१ जून पर्यंत संचारबंदी कायम आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राजकीय, समाजी, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र जमण्यास संचारबंदीचे लावण्यात आल्याने सर्वानी नियमांचे कडक पालन करणे गरजेचे आहे.
अशावेळी दासरी -माला दासरी समाजाचे कुलदैवत भगवान श्री नृसिंह जयंती दि.२५ में रोजी आली आहे. दरवर्षी या दिनी सर्व समाज बांधव नांदेडसह कारखेड, तामसा व इतर ठिकाणच्या श्री नृसिंह मंदिरात एकत्र जमून उत्साहात जयंती सोहळा साजरा करून मनोकामना करतात. मात्र सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन शासनाच्या आदेशामुळे सर्व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे समाज बांधवानी नृसिंहाची आराधना घरात राहूनच कुटुंबासह साजरी करावी आणि रात्रीला पूजन करून ७, ९ किंवा ११ असे दीपप्रज्वलन करून या महामारीच्या संकटातुन बाहेर काढण्याची प्रार्थना भगवान नृसिंहाकडे करावी. असे आवाहन दासरी -माला दासरी समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष मुरहारी दमण्णा यंगलवार यांनी केले आहे.