
प्रतिनिधी:आशिष नैताम
शरीराच्या व मनाच्या ऊत्तम आरोग्यासाठी नियमितपणे योग करणे आवश्यक आहे. २१ जुन आतंरराष्ट्रीय योग दिवस पोंभुर्णा येथे सकाळी ६ वाजता राजराजेश्वर मंदिरासमोरील पटांगणावर साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात योग समितीचे तालुका अध्यक्ष दिलीप मॕकलवार आणि योग समितीचे प्रदिप दिवसे ,आशाताई गुडेपवार ,सुनिता मॕकलवार तसेच सुनिता रमेश ढुमणे ( M.A. योगशास्र् ) सोनापुर यांचे भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती अल्का आत्राम ,अजीत मंगळगिरीवार ,ईश्वर नैताम ,रुषी कोटरंगे ,हरी ढवस,मोहन चलाख ,गजानन मडपुवार ,माजी नगराध्यक्षा स्वेता वनकर ,माजी ऊपनगराध्यक्षा रजीया कुरेशी ,नेहा बघेल तसेच भाजपा पदाधिकारी आणि योगसमिती सदस्य ऊपस्थित होते.
