शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आकाशाकडे,शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)


या वर्षी लवकर व चांगला पाऊस येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता त्याप्रमाणेच रोहिनी नक्षत्रामध्ये तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने व त्यानंतर मृगनक्षत्राच्या सुरवातीला पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या ने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून शेवटी मृग नक्षत्राचे अखेरचे आठ दिवस कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे.
दोन दिवसांपासून आद्रा नक्षत्राला सुरवात झाली असून आद्रा नक्षत्र सुरुवातीच्या दिवसात रुसल्या चे पाहावयास मिळत आहे आहे जर दोन दिवस पावसात पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक व तुषार सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी सिंचनाचा वापर सुरू केला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांच्या नजर आकाशाकडे लागल्या असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे.