आरंभी मार्ग चिरकुटा सावंगा( बु.) रोड तातडीने दुरुस्त करा, सभापती व सरपंच संघटनेकडून तहसीलदारांना निवेदन

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

दिग्रस तालुक्यातील आरंभी मार्ग चिरकुटा सांवगा रोडची आर. एन. एस. कंपनीच्या ओव्हरलोड वाहतूकामुळे दयनीय अवस्था झाली असून हा रोड तातडीने दुरुस्त करण्यात यावा.यासाठी दिग्रस पंचायत समितीच्या सभापती सौ. अनिता ताई दिवाकर राठोड तसेच सरपंच संघटनेकडून तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दिग्रस तालुक्यातील दाभा येथे आर. एन. एस. कंपनीचे गिट्टी क्रेशर खदान असून या गिट्टीखदाना वरून आरंभी मार्ग चिरकुटा सावंगा या रस्त्यांनी रात्रंदिवस ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहेत. या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहन चालकाचे जीव धोक्यात आले असून कधी अपघात होईल हे सांगता येत नाही. या रस्त्याचे मुख्य बाजारपेठ दिग्रस असून या रस्त्यावर शिवनी,झिरपूरवाडी, दाभा आरंभी,फुलवाडी,नेताजी नगर,सावंगा, जोगलदरी,धानोरा खुर्द,चिरकुटा, बेलोरा,सावंगा बुद्रुक इत्यादी गावातील वर्दळीचा रस्ता असून रात्रंदिवस या रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. सदर या रस्त्याचे रात्री-बेरात्री ये जा करणे म्हणजे तारेवरची कसरत करून आपला जीव धोक्यात टाकावे लागत आहेत. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पंचायत समिती आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी तक्रार दाखल केली आहे. त्या अनुषंगाने आज पंचायत समितीच्या सभापती सौ अनिताताई दिवाकर राठोड तसेच सरपंच संघटनेचे अध्यक्ष तसेच इतर सरपंच व गावकरी मिळून तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देऊन सदर या दयनीय अवस्था झाली असून हा या रस्त्या तातडीने दुरुस्त करण्यात यावा.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदन देताना सभापती सौ अनिताताई दिवाकर राठोड, माजी जि. प. सदस्य दिवाकर राठोड सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा सरपंच व इतर गावकरी नागरिक उपस्थित होते.