
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
ग्राम स्वराज्य महामंच आणि गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक जागर, आणि आपल्या पारंपरिक कला चे संवर्धन करण्यासाठी समाजातील ” लोककलावंत स्नेहमिलन सोहळा ” चे आयोजन केले होते
स्नेहमिलन सोहळा चे अध्यक्ष मा.मधुसुदन कोवे गुरुजी -ग्राम स्वराज्य महामंच हे होते उद्घाटक मा.अविनाशजी वारजुरकर माजी आमदार चिमुर, प्रमुख उपस्थिती मा.प्रा.मोहण वडतकर उपाध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच,मा सतिश भाऊ वारजुरकर जिल्हा परिषद सदस्य,मा राहुल ढोकं उपसभापती मा कृष्णा भोंगाडे, अशोक कपिले विदर्भ राज्य आंदोलन समिती हे उपस्थित होते
पारंपरिक कलावंत,भजनी, किर्तनकार,शाहीर, तमाशा कलावंत, ढोलकी वादक,चोनक वादक,किंगरी वादक, गोंधळी कलावंत,डुमरु वादक बासरी वादक विविध क्षेत्रातील कलावंतांनी समभाग या कार्यक्रमात नोंदविला होता आणि पारंपरिक कला समाजातील लोकांनी जोपासली पाहिजे यासाठी उद्बोधन करण्यात आले होतेसामाजिक उद्बोधन कार्यक्रम घेताना लोकं कलावंत यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून लोकजीवन आणि लोकजागृती केली आणि आपली सामाजिक संस्कृती जे जतनासाठी लोक कला मंच स्थापन करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन ग्राम स्वराज्य महामंच च्या सौ प्रितीताई दिडमुठे उपसरपंच ग्राम पंचायत साठगाव आणि गुरुदेव सेवा मंडळ साठगाव यांनी केले होते.
