ओबीसीवादी चळवळी च्या वर्धापनदिनी रामटेक तालुका ओबीसीवादी चळवळ च्या वतीने वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा

सहसंपादक:प्रशांत विजय बदकी

स्व. सुप्रिया संजय कोकरे यांनी ओबीसीवादी चळवळीची 30 जुन 2010 रोजी स्थापना केली, समाजातील सर्व ओबीसी बांधव यांना एकत्र आणत ओबीसी समाजाच्या हितासाठी काम करणे हा एकमेव उद्देश साध्य करण्यासाठी ओबीसीवादी चळवळीची स्थापना करण्यात आली.ओबीसीवादी चळवळीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी कोकरे यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याचा निश्चय केला आहे.

 

विदर्भ प्रमुख मा.शरद तराळे यांच्या नेतृत्वाखाली रामटेक येथे आपल्या घरासमोरील दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा रामटेक तालुका अध्यक्ष मा, धनंजय तरारे यांनी वृक्षारोपण केले, उपस्थित,ओबीसीवादी पदाधिकारी यांचे हस्ते वृक्षारोपण करून वर्धापनदिन साजरा करण्यात आला, रामटेक ला वृक्षारोपण करून पाळण्यात आला , शोभना तरारे वृषभ सहारे व विठ्ठल जी आदमने उपस्थित होते तर सहकार्य ,ओबीसीवादी चळवळ रामटेक तालुका समस्त पदाधिकारी यांनी केले.