संत भोजाजी मंदिरात पुरणपोळी स्वयंपाकासह समाधी दर्शन बंद

  • Post author:
  • Post category:इतर

मंदिरपरीसरात चारचाकी वाहनांणाही प्रवेश नाही

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

सध्यास्थितीत राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत आहे, त्यामुळे संसर्ग नियंत्रणासत्व आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवशकता असल्याने शाषणाने वेळोवेळी घालून दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोर पण पालन करणे बंधनकारक असल्याने आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान मध्ये पुरणपोळी स्वयंपाकासह समाधी दर्शन सुद्धा बंद करण्यात आले आज जिल्हाधिकारी वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व देवस्थानच्या अध्यक्षांच्या सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच मंदिरात परिसरात चारचाकी वाहनांना प्रवेश निषेध करण्यात आला आहे, त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरीत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून उद्या 6 जानेवारी पासून श्री संत भोजाजी महाराज देवस्थान नागरिकांसाठी बंद राहणार असून फक्त मंदिरातील पुजारी व समितीने नेमलेल्या मोजक्या व्यक्तीसह हरिपाठ काकडा आरती दैनंदिन समाधी पूजन नियमित सुरू राहणार असल्याचे अध्यक्ष डॉ.विजय परबत व विश्वस्त मंडळ यांच्या कडून सांगण्यात आले आहे.