
कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव मो नं ७७१९८६९०९१
हदगांव – तालुक्यातील कोळी येथे युवकांच्या हस्ते समाजिक बांधिलकी जोपासून वृक्षारोपण करण्यात आले.
मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. निसर्गातूनच माणसाचा जन्म झालाय आणि याच निसर्गातून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात.
निसर्गात माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊ लागली. त्यामुळे मनुष्य जीवन जगणे सोपे झाले. तसेच या निसर्गातील सर्वात मोठी देणगी म्हणजे झाडे.झाड हे आपल्या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. वृक्ष आपल्या निसर्गाची शोभा वाढवतात. पर्यावरणाला, निसर्गाला झाडांमुळे सौंदर्य प्राप्त होते .वृक्ष आपल्याला जीवनावश्यक सर्व गोष्टी देतात.
आपण जर बारकाईने लक्ष दिले असता आपल्याला लक्षात येईल की, मनुष्याचे आयुष्य पृथ्वीवर टिकूनकोणवण्यासाठी वृक्ष किती महत्त्वाचे भूमिका बजावतात.सर्वच मनुष्याला सतत निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते. साधे आपण कुठेतरी फिरायला जायचा विचार केला असताना आपण निसर्गरम्य ठिकाण निवडतो. यामागचे कारण म्हणजे आपल्याला आजूबाजूचा हिरवागार आणि मनाला मोहित करणाऱा व आपल्या दृष्टीला शांत करणारा निसर्ग पाहायला खूप आवडतो.
आपल्यातील कोणी विचार करतो का हे वृक्ष नसते तर?जर हे वृक्ष नसते तर, आपले जीवनच इतके सुरळीत चालले आहे तितके सुरळीत चालले नसते. भरपूर प्रमाणात वृक्षतोड झाल्याने आपल्या आजूबाजूच्या वन क्षेत्र कमी होत चालले आहे.याचीच समाजिक बांधिलकी जपून कोळी येथील मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित कोळी गावचे मा. उप सरपंच गजानन जगताप , युवानेते कृष्णा पाटील कोळीकर , अंकुश चौतमाल , दत्ता सुरोशे , अविनास जगताप , अरुण जगताप आदी.
