प्रकल्पबाधीत कुंटुंबाना नोकरी नाही

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार, कोरपना

अल्ट्राटेक सिमेंट कंपनी -आदीवासी चा सघर्षं

पेरणी अडवित आदीवासी कुटूंबाचा दमदाटी गडचांदुर येथिल पूर्वीचे मानिकगढ़ सीमेंट सध्याचे अल्ट्राटेक सीमेंट कंपनीचे कुसुंबी व नौकारी येथिल आदीवासी शेत जमीनी कंपनीने नियमबाह्य बळकावित आदिवासी कुटुंबा ना बेघर करीत त्याच्या शेतजमीनी हडप केल्याच्या अनेक तक्रारी असुन कुसूंबी खदानी मध्ये १४ शेतकऱ्याचा भुपुष्ठभोगाधिकार व जमीन खरेदी न करता उत्खनन केल्याचे वनविभाग व महसूल चौकशी तुन निष्पण झाले मात्र प्रशासन कार्यवाही करत नसल्याने हा वाद व सघर्षं होत असल्याचे बोलल्या जाते पोलीसाकडे अनेक तक्रारी दाखल करण्यात आले मात्र महसुल अधिकारी पोलीसाच्या अहवालाचे व निर्देश देत नसल्याने कंपनी मुजोरी व बळाचा वापर करीत आदिवासी मध्ये दहशत माजवित असल्याचे अनेक घटना घडल्या आदीवासी वर सशंयीत आरोपी म्हणुन गेल्या ३ वर्षात ७ गुन्हे दाखल करण्यात येऊण वेठीस पकडल्या जात असल्याने पोलीसाच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थीत होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे कोर्ट विद्यमान तहसीलदार राजूरा यांचा दिनांक 7 जुलै2020 आदेशानुसार कुसुंबी लिगंणडोह नोकारी हा सार्वजनिक रास्ता खुला करण्याचा आदेश पारित करून उपरोक्त रस्ता खुला करण्याचे निर्देश देऊनही गेल्या एक वर्षापासून कंपनीने त्या रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम केले गेट काढलेले नाही शासनाने 17 8 1981 च्या मुद्दा क्रमांक पाच मध्ये हा सार्वजनिक रस्ता भूपृष्ट अधिकारात कंपनीला बहाल केलेले नाही असा असतानासुद्धा कंपनीने अनाधिकृत रोप-वे सायलो क्रेशर अनेक ठिकाणीगेट बसून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याच्या तक्रारी असतानासुद्धा त्यांच्याकडे डोळेझाक करण्यात आली सदर रस्ता खुला करावा यासाठी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा जन सत्याग्रह आदिवासी संघटनेने दिला आहे मोजा नोकारी येथील सोमा आत्राम यांचे सर्वे नंबर 18 ची चार हेक्‍टर 17 जमीन प्रत्यार्पण आदेश तहसीलदार यांच्या न्यायालयाने दिनांक 30 9 2020 रोजी देऊन त्या जमिनीचे 2021 मध्ये सातबारा फेरफार नोंद लावण्यात आले आहे आदिवासींनी त्या जमिनीवर ताबा केला असून पेरणी साठी गेले असता माणिकगड सिमेंट कंपनी चे भारत वैद्य राजू प्रधान प्रमोद झाडे राजकुमार क्षेत्रीय दिगंबर चौधरी राजेंद्र अंभोरकर 35 ते 40 सिक्युरिटी गार्ड घेऊन शेतकऱ्यांच्या बैलाला बेदम मार धक्का बुक्की जातीवाचक शिवीगाळ व महिलांना शिवीगाळ करून धक्का बुक्की व हात धरून धक्का दिल्याने महिला जमिनीवर पडल्या तसेच बैलांना दुखापत होऊन जखमी झाले आहे शेतामध्ये पेरणी करत असताना आडवे होऊन अडथळा निर्माण केला आदिवासी भयभीत होऊन या हल्ल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे आदिवासी यांना शिवीगाळ करून संगनमताने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हल्ला करीत भीती निर्माण केली असल्यामुळे वातावरण तापले आहे गडचांदूर पोलीस स्टेशन येथे आदिवासी यांनी तक्रार देऊन कंपनीच्या दोषी कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा कंपनीची बळजबरी आदिवासींवरील अन्याय सहन केल्या जाणार नाही असा इशारा आला असून पोलिसांच्या कारवाईकडे आदिवासी यांचे लक्ष लागले आहे कंपनी बळाचा वापर करून आदिवासी यामध्ये भीती निर्माण करीत असल्याचा आरोप होत असून जंगा आत्राम लक्ष्मी पेंदोर वनिता कोचाळे तानेबाई आत्राम सोमा आत्राम यांनी पोलीसात तक्रार दाखल करूण कार्यवाहीची मागणी केली असुन ठानेदार गोपालभारती यांनी तक्रार घेत चौकशी करुण कार्यवाही करण्यात येईल असे अर्जदारास माहीती दिली