आरोग्य उपकेन्द्रावर लसिकरण अँन्टीजन चाचणी सुविधा उपलब्ध करा: आबीद अली यांची मागणी

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार, कोरपना


चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगाना सीमेवर असलेल्या कोरपना तालुक्यामध्ये कोरोना आजाराने ग्रामीण आदिवासी भागात थैमान घातले असून अनेक गावांमध्ये ताप खोकला आजाराने आणि कुटुंब त्रस्त आहेत दळणवळण व्यवस्था व आर्थिक अडचणीमुळे अनेक रुग्णांना उपचार घेण्यामध्ये अनेक अडचणीचा सामना करावा लागतो ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सुविधा असली तरी सामान्य लोकांना 16 ते 20 किलोमीटर अंतर कापून जाण्याची पाळी आली आहे दुसरा डोस तसेच 45 ते 60 वयोगट अठरा ते चौरेचाळीस वयोगट त्याचप्रमाणे आरोग्य तज्ञांनी झिरो चे 18 वयोगटातील संभाव्य होणाऱ्या परिणामाचे संकेतदिल्यामुळे ग्रामीण भागामध्ये चिंतेचे सावट पडले आहे कोरपना तालुक्यामध्ये 113 गावे दोन ग्रामीण रुग्णालय 3प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच 22 आयुष्यमान उपकेंद्र आहे ग्रामीण भागातील मृत्यु दर वाढ झाली असून अनेक रुग्ण घरोघरी आजारी आहेत rt-pcr चाचणी करण्यासाठी पुढे येत नसल्याने गावपातळीवरच उपचाराअभावी आपले जीवनाचा आखी श्वास घेतअसल्याचे चित्र आहे अशा भयावह परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील रुग्णासाठी शासनाने ऑनलाईन मॅनेजमेंट प्रक्रिया अत्यंत गैरसोयीची माहितीअभावी ग्रामीण लोकांना गैरसोयीची ठरत असून प्रवासाने येणाऱ्या अडचणी वेळ घालवणे यामध्ये जीव गमावण्याची पाळी आलेली आहे यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीचे ठरावे याकरिता सुलभ पद्धतीने ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या 22 आयुष्यमान उपकेंद्रांमध्ये एंटीजन चाचणी लसीकरणाची सुविधा करून देण्यात यावी ज्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे अशा ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये विलगीकरणकरण्या साठी उपाययोजना करण्यात यावी अनेक ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध झाला असल्याने नियोजन करण्याची नितांत आवश्यकता आहे ग्रामीण भागातील चाचणी लसीकरण सुलभ व्हावे यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आबिद अली यांनी पालक मंत्री विजय वडेट्टीवार खासदार बाळु भाऊ धानोरकर आमदार सुभाष धोटे व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे