अपघातातील जखमींना जीवनदान देणारा देवदूत मनोज भाऊ मुन,महामार्ग विभागाकडून ‘मृत्युंजय दूत’ म्हणून गौरव

लोकहीत महाराष्ट्र राजुरा ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/DkHZJHNRCOVDPbTRN9QjUq

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा

काही माणसं प्रसिद्धीपासून कोसो दूर राहून आपल्या सत्कार्याने समाजाची आपल्या ऐपतीनुसार सेवा करत असतात.त्यांना प्रसिद्धीची वा पुरस्काराची कधी आवश्यकता नसते.असेच एक नाव आहे मनोज मुन!
दरवर्षी आपल्या भारतात महामार्गावर कित्येक अपघात होत असतात,प्रथमोपचाराऐवजी कित्येकांचे प्राण जातात,एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास मदत करणाऱ्यांपेक्षा बघ्याची भूमिका घेणारी माणसेच जास्त दिसून येतात.अपघातात गंभीर इजा झाल्यास त्या व्यक्तीस मदत करण्यासही बराच उशीर होऊन जातो,प्रथमोपचार न झाल्यास रस्ता अपघातात कित्येक लोकं आपले प्राण गमवीत असतात,अशावेळी त्या व्यक्तीचे प्राण वाचविणारा व्यक्ती हा एखाद्या देवदूतापेक्षा काही कमी ठरत नाही.अशा बिकट प्रसंगी कित्येकदा मनोज अपघातस्थळी धावून जातो,गंभीर अपघातग्रस्त इसमाचा प्रथमोपचार करतो,त्याला दवाखान्यापर्यंत नेण्याची व्यवस्था करतो.
चंद्रपूर-हैद्राबाद राज्यमार्गावर तेलंगणा सीमेवर लक्कडकोट नावाचे छोटेसे गाव आहे, त्या गावात मनोज मुन हा युवक शेती करतो,शेतीसोबत जोडधंदा म्हणून पानठेला चालवतो.मनोज हा छोटासा व्यवसाय करणारा युवक जरी असला तरी त्याच्यात माणुसकी नावाची गोष्ट कायम आहे.महामार्गावर कित्येक अपघातात त्याने कित्येक लोकांचे प्राण वाचविले आहेत तर अजूनही त्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे.दोन वेळेस गावाचे सरपंच-उपसरपंच पद भुषविलेल्या मनोजने राजकारणापेक्षा सामाजिक कार्याला अधिक महत्व दिले आहे.मनोज नाते आपुलकीचे या सेवाभावी संस्थेशीही जुळलेला असून संस्थेमार्फत आपले योगदान त्याने वेळोवेळी दिले आहे. अशा युवकाचा पोलीस खात्याच्या महामार्ग विभागाकडून ‘मृत्युंजय दूत’ म्हणून नुकताच त्याच्या गावी गौरव करण्यात आला.मनोजचे कार्य समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी तर नाते आपुलकीचे संस्थेसाठी अभिमानास्पद आहे.