
होमराज देवतळे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दिपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाच्या सुरवातीला दोन मिनिटांचे मौन पाळून सर्व उपस्थितांनी होमराज देवतळेंना श्रद्धांजली अर्पण केली . तब्बल २२ वर्षानंतर स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्ताने या बॕचचे सर्व विद्यार्थी एकत्र आले होते . सकाळी १० वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रविण खिरटकर सर व प्रा. नरेंद्र लांबट सर उपस्थित होते . अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना कडू सरांनी बाबांच्या या पावन भूमीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल या संपूर्ण बॕचचे मनापासुन अभिनंदन केल्याचे सांगतांनाच आनंदवन पाहिल का ? या प्रश्नाच उत्तर हो म्हणून देणं व प्रत्यक्ष आनंदवनात जावून तेथिल कार्य प्रत्यक्ष जाणून घेणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्याच सांगितल . त्यांनी बाबांच्या कार्यावर अत्यंत मार्मिक प्रबोधन करुन विशेषतः शिक्षकांनी समाजात कार्य करत असतांना आपल्या कामावर निष्ठा ठेवून कुणाच्याही टीकेला प्रत्यक्ष उत्तर देत बसण्यात वेळ न घालवता आपल्या कार्यावरच लक्ष केंद्रीत करुन आपल्या कार्याद्वारेच टिकाकारांना उत्तर द्यावे असे प्रतिपादन केले . बाबांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेला आपल्या कार्याद्वारेच उत्तर दिले म्हणून ते आनंदवनाचे नाव जगात अजरामर करु शकले असेही कडू सर म्हणाले . प्रा . खिरटकर सरांनी व प्रा. लांबट सरांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस करुन त्यांच्याशी संवाद साधला . सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येकाचा व्यवस्थित परिचय करुन दिल्यानंतर सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत विविध मनोरंजनात्मक उपक्रमातून दिवसभर आनंद साजरा केला . या दरम्यान मागिल वर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सौ. उज्वला प्रविण खिरटकर , कु. वनिता कष्टी यांचा कडू सरांच्या हस्ते शाॕल व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला . आपले शिक्षकी पेशाचे कार्य सांभाळून व सामाजिक बांधिलकी ची जाणीव ठेवून गेल्या अनेक वर्षांपासून हिंगनघाट मध्ये सातत्याने रामदेवबाबांच्या संस्थेशी संलग्न राहून रोज हिंगनघाट येथिल महिलांना योगाचे व प्राणायामचे धडे देणा-या कु. पौर्णिमा आखाडे यांचाही कडू सरांच्या हस्ते शाॕल व सन्मानचान्ह देवून सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना स्मृती चिन्ह देवून हा कार्यक्रम सदैव सगळ्यांच्या स्मरणात राहील याची व्यवस्था करण्यात आली . बाविस वर्षानंतर एकमेकांना भेटलेल्या प्रत्येकाच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता . कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल गांधी यांनी तर सूत्रसंचलन कु. सविता बगडे , सौ. मनिषा चवले व सौ. वर्षा वानखेडे यांनी सांभाळले . आभार गजेंद्र ढवळे यांनी तर नियोजन सुनिल पहापळे , सचिन वानखेडे , उज्वला खिरटकर , संतोष उमाटे , गोपाळ गुडधे यांनी केले .
