
नागपूर चंद्रपूर हाय वे वरील अपघाताची घटना ताजी असतानाच वरोरा शहराबाहेर असलेल्या हिंदुस्थान पेट्रोल पंप जवळ एक ट्रॅव्हलस व दुचाकी चा अपघात झाला.छोट्या ट्रॅव्हल्स गाडी क्र. MH 40 BG 6420 या वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. दुचाकी चा क्र. MH 32 T 2719 असून जखमींला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.
