अवैध दारूविक्रीवर तात्काळ कारवाई करा :गीत घोष ,राष्ट्रीय अध्यक्ष ,अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषद वरोरा

पोलीस स्टेशन चे ठाणेदार खोब्रागडे याना निवेदन

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा

मागील 5 वर्षांपासून जिल्ह्यात दारूबंदी असताना देखील वरोरा तालुक्यात दारूचा महापुर वाहतोय यावर कुठेतरी आला घालावा यासाठी अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष यांनी वरोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार खोब्रागडे याना निवेदन दिले.

दारूच्या व्यवसायात शेकडो अल्पवयीन तरुण गुंतलेले आहेत.या अवैध दारू विक्रीच्या व्यवसायामुळे या अल्पवयीन युवकांचे भवितव्य धोक्यात आहे.मध्यवर्गीय मद्यशौकीन महागडी दारू खरेदी करीत असल्याने त्यांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे.वरोरा तालुक्यातील सीमावर्ती भागातुन व जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत आहे.वरोरा तालुक्यातील अवैध दारू विक्रीचे मुख्य केंद्रस्थान बनले आहे.अण्णा नामक व्यक्ती हा या भागातील मोठा डीलर झाला आहे.भद्रावती, शेगाव,वरोरा क्षेत्रात महिन्याकाठी 12 हजार पेट्या पुरवीत असून या अवैध कमाईत अधिकाऱ्यांना देखील हिस्सा मिळत असल्याच्या चर्चा आहे.तस्करी करण्यात आलेल्या दारूच्या पेट्या कोणत्या दुकानातून येते याचा शोध घेऊन त्या विक्रेत्यांचे परवाने रद्द केले पाहिजे अशी मागणी करीत अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष यांनी केली. निवेदन देतेवेळी गीत घोष,संतोष पेंदोर,युवराज सातपुते,सौरभ नगराळे,युवराज चांदेकर ,अमोल कुमरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.