
सहसंपादक:प्रशांत बदकी
वरोरा तालुक्यातील प्रत्येक बातमी मिळवा सर्वात आधी
https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY
वरोरा शहरात कोरोना चा धुमाकूळ सुरू असताना नागरिक कोरोना टेस्टिंग वर भर देत आहे.त्यामुळे भरपूर नागरिक ,व्यापारी, मजूर वर्ग सकाळी 7 वाजता पासून रांगेत नंबर लावण्यासाठी येत असतात .
समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ती, राजकिय नेत्यांना/पत्रकारांना सोबत घेऊन व्हीआयपी एन्ट्री करून कोरोना टेस्ट करत असल्याचे आढळले .व्हीआयपी नागरिकांमुळे मात्र सामान्य नागरिकांना 5 -5 तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे दिसून आले .ही व्हीआयपी पद्धत बंद करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे
