
प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा
राज्यातील
सर्पमित्रांकडून २३ मार्च रोजी विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनामागण्यांचे
निवेदन देण्यात आले आहे.
त्यानंतर ४५ दिवसांत मागण्यांबाबत
योग्य तो निर्णय न झाल्यास सर्पमित्र काम बंद आंदोलन करणार आहेत. वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये
कोणताही वन्यजीव पकडणे किंवा बंदिस्त करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, मनुष्यवस्तीत येणाऱ्या सापांचे मनुष्यापासून तसेच मनुष्याचे सापांपासून संरक्षण व्हावे, यासाठी वन विभागाकडे कोणतीही उपाययोजना नाही. तसे मनुष्यवळही नाही. त्यामुळे सापांच्या रक्षणासाठी सर्पमित्रांना धाव घ्यावी लागते. काही तोतयांकडून कसलीही माहिती नसताना चुकीच्या पद्धतीने साप पकडले जातात. त्यामुळे सापांचे हाल होत आहेत. तर काही
वेळा सर्पदंशाने लोक दगावत आहेत.
दिवसभरात राज्यात किती साप पकडले. कुठे पकडले. कोणी पकडले
व ते सुरक्षित जंगलात सोडलेत का,
याची कोणतीही नोंद वनविभागाच्या
कार्यालयात नाही. त्यामुळे साप जास्त
दिवस बंदिस्त करून ठेवणे, दुर्मीळ
सापांची देवाणघेवाण व ते सुरक्षित जंगलात सोडलेत का,
याची कोणतीही नोंद वनविभागाच्या
कार्यालयात नाही. त्यामुळे साप जास्त
दिवस बंदिस्त करून ठेवणे, दुर्मीळ
सापांची देवाणघेवाण करणे, सापांचे
खेळ करणे यासारख्या गोष्टी वाढत आहेत.
या वेळी वरोर्यातील अपास चे सर्पमित्र विशाल मोरे,पंकज खाजोने प्रशांत राऊत, हेमंत बागडे,विराग कल्मबे, अमित ननावरे,सूरज दुबे,बंटी खडगे,भूषण नक्षीने, अनिकेत नागपुरे उपस्तीत होते
