अखेर तो वाघ निघाला ,वनविभागाचा सुटकेचा श्वास

वरोरा तालुक्यातील आल्फर आणि मोखाडा रस्त्यावरील एका शेतात असलेल्या विहिरीत आज पट्टेदार वाघ पडून असल्याचे दिसून आले.शिकारीच्या शोधात हा वाघ इथे आला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मोखाडा या भागात असलेल्या शिरपाते यांच्या शेतात असलेल्या विहिरीत हा वाघ पडला असून या बाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.विहिरीत वाघ असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे आजूबाजुंच्या गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली. वनविभाग घटनास्थळी दाखल होत वाघाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

गावकऱ्यांनी वाघाला पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना वाघाला बाहेर काढण्यात अपयश येत होते.अखेर एक खाट विहिरीत सोडत वाघाला बाहेर काढण्यात यश आले .या वाघोबाच्या दर्शनाने मात्र या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले.