
प्रतिनिधी:आशिष नैताम
आज दिनांक १३/०७/२०२१ रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे समाज कल्याण विभाग चंद्रपूर येथे निवेदन देण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही मागासवर्गीय व नवबौद्ध विद्यार्थांना मिळते परंतु २०२०- २०२१ विद्यार्थांचे कॉलेज च वर्ष संपत आले तरी अद्याप विद्यार्थांच्या खात्यात निधी जमा झालेला नाही.
त्यामुळे विद्यार्थी ला घरभाडे, बुक पुस्तके, फीस इत्यादी …..बरेच प्रश्नाला. समोर जावे लागते. लवकरात लवकर तो निधी विद्यार्थांच्या खात्यात जमा करावे.
अन्यथा उग्र स्वरूपाचे सम्यक विद्यार्थी आंदोलन करेल असा इशाराही मा. धिरज तेलंग सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष यांनीनिवेदनाच्या माध्यमातून समाज कल्याण विभाग चंद्रपूर ला दिला.त्यावेळीे कार्यकर्ते प्रणित मानकर, संघर्ष थेरकर, आत्तदिप गेडाम, राहुल मासलकर, सुदर्शन नंदने, प्रज्योत बोरकर, निहाल माटे, कौशिक खोब्रागडे, अमन थेरकर, रोशन लाकडे, सौरभ माटे स्वाधार चे लाभार्थी यांची उपस्थिती होती.
