पाहणारे डोळे आणि मदतीचे हात या संस्थेच्या वतीने त्या गरजू कुटुंबाला दुःखातून सावरण्यास केली आर्थिक मदत

पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथील घटना दिनांक २३/०७/२०२१ ला जे व्हायला नको ते घडले. स्व.मनोज यादव उपरे वयाच्या ३१ व्या वर्षी देवाघरी गेले, अल्पशा आजाराने ते आज आपल्या मधून निघून गेले. घरचा कमवता पुरुष गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट तुटून पडले. त्यांच्या मागे दोन लहान मुली व पत्नी असा संसार सोडत ते देवाघरी गेले. स्व.मनोज उपरे हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर होते नेहमी समाजासाठी काहीतरी करून आपले जीवन आनंदात जगू असे स्वप्न बाळगणारे आज आपल्यात नाही. त्यांच्या कुटुंबावर किती मोठे संकट निर्माण झाले याची जाणीव लक्षात घेऊन उमरी पोतदार येथील सामाजिक संस्था “पाहणारे डोळे आणि मदतीचे हात” बहुद्देशीय सामाजिक संस्था ही समोर येऊन त्या गरजू कुटुंबाला दुःखातून सावरण्यास मदत म्हणून लोकवर्गीणीतून व सोशल मीडियाचा वापर करीत फोने पे / गुगल पे च्या माध्यमातुन पैसा गोळा करण्यात आला. या संस्थेच्या कार्याची दखल घेत माजी अर्थमंत्री व पर्यावरण मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राहुल भाऊ संतोषवार यांच्या कडून ५००० रू ची आर्थिक मदत करण्यात आली. सोबतच मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या कडून ५००१ रू ची आर्थिक मदत करण्यात आली. यांच्या कडून तात्काळ मदत करण्यात आली. स्व. मनोज उपरे यांच्या लहान मुलीचा आज ६ ऑगस्ट ला वाढदिवसाचा औचित्य साधून संस्थेच्या वतीने वाढदिवस साजरा करून “पाहणारे डोळे आणि मदतीचे हात” बहुद्देशीय सामाजिक संस्था यांनी जमा केलेली रोख रक्कम ३०९९१ रुपये/- त्या कुटुंबाला सुपूर्त करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अंकुश उराडे, संदिप यम्पलवार,निखिल झबाडे,अमित कुमरे,निखिल झुरमुरे,भिमराव मेश्राम,अविनाश लेनगुरे, तेजराज सिडाम, चंद्रकांत सिडाम,नदिम कुमरे,विक्रम लेनगुरे,मनिष ठाकरे, चेतन कावळे, अंकुश लेनगुरे, महेश कुलमेथे उपस्थित होते.