पोंभुर्णा शहरात डेंगू,मलेरियाचे रुग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण शहरात फॉगिंग मशीन द्वारे धुळफवारणी व स्प्रे पंपाद्वारे औषधाची फवारणी करण्यात यावी:वंचित बहुजन आघाडी तालुका/शहर शाखा पोंभुर्णा चे मुख्याधिकारी यांना निवेदन…

प्रतिनिधी:आशिष नैताम

संपूर्ण पोंभुर्णा शहरात डासांचे प्रमाण वाढले असून यामुळे शहरात डेंगू,मलेरिया,टायफाइड तापाची लागण झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी फॉगिंग मशीन द्वारे धुळफवारणी व पाठीवरील स्प्रे पंपाद्वारे औषधीची फवारणी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका/शहर शाखा पोंभुर्णा ने मुख्याधिकारी पोंभुर्णा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पोंभुर्णा शहरात डेंगू मलेरियाच्या तापाची लागण झाली असून फॉगिंग मशीन द्वारे धुळफवारणी व पाठीवरील स्प्रे पंपाद्वारे औषधीची फवारणी करण्याचे आदेश आपण आपल्या स्तरावर देऊन जनतेला दिलासा द्यावा…।
शहरातील नाल्या, गटारे,मोकळ्या जागा, हे डास निर्मिती चे केंद्र बनत आहेत.
यापुर्वीही पोंभुर्णा शहरात डेंग्यू तापाची साथ आली होती यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते तर नगरवासियांना डेंग्यू मुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता. आधिच कोरोणाचे संकट ओढवले यात गोरगरीबांची जमापुंजी खर्च झाली.यामुळे शहरवासीय पुरता खंगुण गेला आहे.अशात आता नागरिकांना रुग्णालयाचा फेरा मारणे परवडणारे नाही.याकरीता आधिच उपाययोजना करणे गरजेचे आहे…
संपूर्ण परिसरात डेंग्यू व मलेरियाच्या तापाचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून साथीच्या रोगाने थैमान घातले असतांना नगरपंचायत, स्तरावर फॉगिंग मशीन द्वारे धुळफवारणी व पाठीवरील स्प्रे पंपाद्वारे औषधीची फवारणी करणे आवश्‍यक आहे तसेच नाल्या व गटारांची साफसफाई करून कचरा उचलणे आवश्यक आहे…
येत्या दोन दिवसांत धुळफवारणी व औषध फवारणी करावी. जर आपण फवारणी केली नाही आणि जर शहरवासीयांना डेंग्यू, मलेरिया तापाची लागण झाली तर याची सर्वश्वी जबाबदारी मुख्याधिकारी म्हणून आपली राहणार आहे व त्यांना दवाखान्यात लागणारा खर्च आपल्याला द्यावा लागेल. असा इशारा हि या निवेदनातून देण्यात आला…।
सदर निवेदन देताना चंद्रहास उराडे तालुका अध्यक्ष,राजु खोब्रागडे शहराध्यक्ष, रुषीजी गुरुनुले,शशिकांत उराडे शहर महासचिव, अतुल वाकडे तालुका युवा अध्यक्ष, अविनाश वाळके जिल्हा प्रमुख आय टी सेल चंद्रपूर,युनिल मानकर, निश्चल भसारकर, ,पराग उराडे,सुमित मानकर इत्यादी पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते…।